भुसावळ विभागातर्फे देण्यात आली माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ विभागातील म्हसावद स्थानक येथे अप लूप लाईन विस्तारीकरण, अप लूप लाईन ७१४ मीटरवरून ७५६ मीटरपर्यंत विस्तार तसेच गतीवाढीकरण यासाठी यार्ड पुनर्रचना कार्य हाती घेण्यात येत आहे. यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्य तसेच ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा काही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. यासाठी काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दि. २३ मार्च ते २६ मार्च या कालावधीत गाड्या रद्द राहतील. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात आले आहे की, त्यामुळे होणारा गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.
गाड्यांचे रद्दीकरण
1) गाडी क्रमांक 11113 देवळाली ते भुसावळ मेमू
2) गाडी क्रमांक 11114 भुसावळ ते देवळाली मेमू
3) गाडी क्रमांक 01212 नाशिक ते बडनेरा मेमू
4) गाडी क्रमांक 01211 बडनेरा ते नाशिक मेमू