पर्यायी रस्त्याचा वापर करण्याच्या सूचना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील म्हसावद स्टेशन येथील रेल्वे गेट क्रमांक १४४ हे वाहतुकीसाठी आज दि. ७ मार्च रोजीपासून ते शनिवार दि. १५ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. तरी वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
म्हसावद स्टेशन रेल्वे फाटक क्रमांक १४४ रेल्वेरुळाच्या दुरुस्तीचे कार्य करण्यासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. याबाबत आजूबाजूच्या पंचक्रोशीतील पाथरी, बोरनार, कुऱ्हाडदे, वावडदा, नागदुली, एरंडोल, बिलवाडी आदी गावांना सुचित करण्यात आले आहे. तरी ग्रामस्थांनी या सूचनेची नोंद घ्यावी आणि पर्यायी रस्त्यांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पाचोरा येथील मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.