विकासकामे ठप्प झाल्यामुळे घेतला निर्णय
जळगाव (प्रतिनिधी) : येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर तालुक्यातील म्हसावद आणि परिसरातील १२ गावे मिळून बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. गावागावात विकासकामे ठप्प झालेली आहेत. तसेच, रेल्वे मंत्रालय बोगद्याला परवानगी देत नाही याचाही निषेध ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी हि निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
म्हसावद गावातून जो उड्डाणपूल आहे त्याला लागुनच भुयारी मार्ग गावाला देण्यात यावा. जेणेकरुन १२ गावे यांना दळणवळणासाठी सोयीस्कर होईल. परंतु केंद्र सरकारकडून रेल्वे मंत्रालय बोगद्यासाठी परवानगी देत नाहीये. आम्हाला तोंडी नाही तर लेखी स्वरूपात भुयारी मार्ग या ठिकाणी होणार असे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासन यांच्या कडून हवे आहे. त्या संदर्भात लवकरच ग्रामस्थ जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देणार असे शितलताई चिंचोरे यांनी सांगितले.
यावेळी यशवंत पवार, आबा चिंचोरे, बापू धनगर, अहमद शहा, सुधाकर पाटील, संजू भील, पिंटू पाटील, श्रीराम धनगर, सर्व ग्रामपंचायत सदस्य म्हसावद, आरिफ पटेल, बोरनार, ईश्वर चिंचोरे, चेतन चव्हाण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.