मेहुणबारे (ता. चाळीसगाव) :- गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक सुरू असताना, मिरवणुकीवर दगडफेक केल्याचा संशय घेऊन एका तरुणावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला १२ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शुभम सुभाष जाधव (वय २६, रा. टाकळी) हे १४ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रासोबत मोबाईलवर मॅच बघत बसले होते. दरम्यान, संशयित आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून, “तुम्हीच मिरवणुकीवर दगडफेक केली,” असा आरोप करत शुभम जाधव आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ केली. आरोपींनी शुभमच्या गळ्यावर पाय देऊन “तुला आज जिवंत सोडत नाही,” असे म्हणत गळा दाबला. तसेच, इतर आरोपींनी त्यांच्या छातीवर पाय देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात वैभव सूर्यवंशी याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली, तर सौरव पवार यालाही मारहाण करून जखमी करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड पुढील तपास करत आहेत.
मिरवणुकीवर दगडफेक केल्याच्या संशयावरून १२ जणांवर गुन्हा
चाळीसगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक केल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना मेहुणबारे येथे घडली. या प्रकरणी १२ संशयित आरोपींविरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींची नावे: गौतम निकम, गोपीनाथ निकम, गणेश बागुल, शुभम निकुंभ, बंटी विजय निकम, श्रीकांत निकम, किरण निकम, मोतीलाल निकम, सनी निकम, सोमनाथ निकम, आकाश गंभीर निकम आणि रोहित निकम (सर्व रा. टाकळी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.









