जळगाव येथे मेहतर समाजातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन
जळगाव (विशेष प्रतिनिधी) – उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथे एका पीडित बालिकेवर चार नरधमानी सामूहिक अत्याचार करून तिचे मणके तोडून जीभ ही काटल्याची घटना दि.14 सप्टेंबर रोजी घडली.मात्र तिचा 29 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला असून त्या चार ही नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र राज्य वाल्मिकी मेहतर समाज व जळगाव येथील मेहतर समाज तसेच बावणी पंचायततर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य वाल्मिकी मेहतर समाजाचे महासचिव व माजी नगराध्यक्ष शिवचरण ढढोरे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना आज दि.30 रोजी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की,आरोपीविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये खटला चालवावा, पीडितेच्या नातेवाईक यांना सरक्षण मिळावा,व या चारही नराधामांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ता संदीप ढढोरे,विलास लोट,सुभाष बेडवाल,सुभाष सपकाळे,मनोज जयराज,आशितोष ढढोरे,रोहित बेडवाल,हर्षल ढढोरे,बंटी कंडारे,पप्पू पवार,आदी मान्यवर व बावणी पंचायतचे जळगावचे पदाधिकारी,तसेच मेहतर समाजचे कार्यकर्ते उपस्थित होते.