जळगाव शहरातील वीस वर्षीय तरुणांकडून कृत्य
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका १५ वर्षीय तरुणीवर मेहरुण तलाव परिसरात तसेच वाहनात वेळोवेळी २० वर्षीय तरुणाकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षण घेत असलेल्या या १५ वर्षीय तरुणीने एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. मार्च ते जुलै २०२४ दरम्यान वेळोवेळी मेहरुण तलाव येथील ट्रॅक जवळ आणि वाहनात वेळोवेळी फोनद्वारे बोलावून फोन मध्ये लैंगिक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देऊन वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. (केसीएन)त्या जाचाला कंटाळून फिर्यादी तरुणीने कुटुंबीयांना माहिती दिली.
त्यानुसार मंगळवार दि. ६ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी स्नेह किशोर लाठीग्रा (किसन सोनी, वय २०, रा. शांती नगर, जळगाव) याच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत.