जळगाव ( प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी उद्यान मेहरून बगीच्यामधील विहिरीत एक अनोळखी इसम बुडून मरण पावला आहे.
त्याबाबतची माहिती मिळाल्यावर पो हे कॉ गफ्फार तडवी , साईनाथ मुंडे ,चंद्रकांत पाटील , नरसिंग पाडवी यांनीं घटनास्थळी जाऊन प्रेत समाधान नाईक, राहुल कोळी यांच्या मदतीने विहिरी बाहेर काढले ही अनोळखी व्यक्ती तीन दिवसापूर्वी विहिरीत पडला असल्याची शक्यता असून त्याचे प्रेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे पोलिसांनी त्याची ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.