जळगावातील कांचन नगरच्या तरुणाला अटक
जळगाव (प्रतिनिधी) : सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २० वर्षीय तरुणाने मेहरूण तलाव परिसरातील झुडपात अत्याचार केला. हा प्रकार ऑगस्ट २०२३ पासून सुरू होता. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले आहे.
करण दत्तू सोनवणे (२०, रा. कांचननगर, जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक १६ वर्षीय मुलगी इयत्ता दहावीत असल्यापासून करण सोनवणे या तरुणाने तिचा पाठलाग करीत तिच्याशी ओळख निर्माण केली.(केसीएन) त्यानंतर तिला वेळोवेळी दुचाकीवर फिरायला घेऊन जात असे. १० सप्टेंबर रोजीदेखील या मुलीला ती शिक्षण घेत असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयापासून दुचाकीवर मेहरुण तलाव परिसरातील झाडाझुडपात घेऊन गेला. तेथे त्याने सोबतचे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत अत्याचार केला. या प्रकरणी मुलीने २६ सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून करण सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास सपोनि प्रिया दातीर करीत आहेत.