जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मेहरूण भागातील तुळजाई नगरात आज १७०० रुपयांच्या नायलॉन मांजासह तो विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.
सपोनि अमोल मोरे यांना गुप्त बातमी मिळाली होती की , तुळजामाता नगर (मेहरुण) येथे एक इसम सुरक्षीतता धोक्यात आणणारा नायलॉन मांजा पंतग उडविण्यासाठी विक्री करीत आहे. त्यानांतर स.फौ. अतुल वंजारी यांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला व आरोपीला जागीच पकडले, मुकेश अशोक वडनेरे,( वय 27 वर्ष, रा. प्लॉट नं. 59 सर्वे नं. 271. तुळजामाता नगर, मेहरुण ) असे आरोपीचे नाव आहे त्याच्या ताब्यातून पंचनामा करून १७०० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. त्याचे विरुध्द एम आय डी सी पोलीस ठाण्यातील पो कॉ साईनाथ मुंडे यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 188, 336 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.