जळगाव (प्रतिनिधी) :- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे शिवजयंतीनिमीत्त महाविद्यालय परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, सईबाई, राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारण्यात आली होती.
एमबीबीएसतर्फे सकाळी रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, प्रा. बापूराव बिटे, रेक्टर गावंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सकाळी स्वच्छता अभियान देखिल महाविद्यालय परिसरात राबविण्यात आले. यात प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा परिसर चकाचक केला. शिवजयंतीनिमीत्त निबंध स्पर्धा, पोस्टर तयार करणे, प्रश्नमंजुषा, कविता सादरीकरण आणि छायाचित्र प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.
यात निबंध स्पर्धेत अपूर्वा पाटील, पोस्टर तयार करणे हार्दीक जैस्वाल, प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रतापगढ टीम, कविता सादरीकरणात शुभदा तोडकर आणि फोटोेग्राफीत पुर्वा सावरकर हे विजेते ठरले. दुपारी महाविद्यालय परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत शिवाजी महाराज यांची वेशभूषा पियुष कुकडे याने साकारली. यात ढोलताशा, लेझीम पथक सहभागी झाले होते. तसेच पथनाट्य देखिल सादर करण्यात आले. सायंकाळी शिवपर्व हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. दिनानाथ रॉय, डॉ. धनंजय बोरोले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवनेरी किल्ल्याची कलाकृती साकारण्यात आली. तसेच तलवार बाजीचे प्रात्याक्षिक समृध्दी मुत्तेपवार, पोवाडा क्रीष्णकांत जाधव, वक्तृत्व राजनंदीनी पाटील, स्त्रीशक्ती विषयावर श्रावणी पाटील यांनी विचार मांडले. तसेच अपूर्वा पाटील हिने ताराराणी, सौरव तांबारे याने सरदार आणि अभिषेक पाटील याने औरंगजेबाची भूमिका साकारली होती. सांस्कृतिक कार्यक्रमात आदित्य निर्वळ याने कविता सादर केली. तसेच याप्रसंगी माजी खा. डॉ. उल्हास पाटील आणि डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन पायल पाटील, साक्षी पिसे, स्वप्नील आढाव आणि अमित पाटील यांनी केल.