• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

एमबीए पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या किंवा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याच्या अनेक संधी : तुषार मुळे

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाअंतर्गत “एमबीए प्रथम वर्ष” स्वागत समारंभाचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 3, 2022
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधि ) – एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश घेणे हे आपल्या करिअरच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे पाऊल आहे. एमबीए पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या किंवा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र याकरता हा अभ्यासक्रम योग्य प्रकारे पूर्ण करणे हे तितकेच आवश्यक आहे हे लक्षात ठेवायला हवे. असे आवाहन डेल कार्निगो सर्टिफाइड सॅाफ्टस्कील ट्रेनर तुषार मुळे यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना केले.

????????????????????????????????????

जळगाव येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश सोहळा अर्थात ‘इंडक्शन- जुनून’ या सोहळ्यात विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, विद्यार्थ्यानी कोणत्याही बाबतीत संकोच न बाळगता पुढाकार घेऊन नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अमुक एखादी गोष्ट मला समजलेली नाही, पण मग मी प्रश्न न विचारता आपले त्या ठराविक बाबतीतील अज्ञान तसेच ठेवतो, हे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाठी खूप नुकसानदायक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी आपल्या ‘कॉलेज टू कॉर्पोरेट’ या प्रवासात आपण अधिकाधिक रोजगारक्षम कसे होऊ या दृष्टीने प्रयत्नशील राहायला हवे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, एमबीए विभागप्रमुख प्रा.डॉ. राजकुमार कांकरिया, एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी सध्याच्या औद्योगिक क्षेत्रातील अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत व अस्पष्टतेच्या काळात विद्यार्थ्यानी स्वतःचे करिअर सुरक्षित करण्यासाठी स्वतःला कायम अद्ययावत ठेवणे गरजेचे असून आपल्यातील ज्ञान, कौशल्य व अनुभव वाढवतानाच आपला दृष्टीकोन हा कायम सकारात्मक व सर्वसमावेशक कसा राहील याकडे लक्ष द्यायला हवे असे सांगितले. यानंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डेल कार्निगो सर्टिफाइड ट्रेनर प्रा. राहुल त्रिवेदी यांनी नेटवर्क लंच व सायको मेट्रिक टेस्ट या उपक्रमाद्वारे आजचे युवक व्यवसायात व वेयक्तिक आयुष्यात कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतात यांचे मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात प्रा.डॉ. राजकुमार कांकरिया यांनी ट्रेझर हंट या मॅनेजमेट गेमच्या सहाय्याने उपस्थित विध्यार्थ्यांना महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. चौथ्या सत्रात प्रा. तन्मय भाले यांनी मॅनेजमेट गेम व पॉवरपाॅईटच्या माध्यमातून उत्तम टीमची उभारणी कशी करावी हे स्पष्ट केले तर पाचव्या सत्रात एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख यांनी व्यवसायाच्या जडणघडनीत अकाऊंट व ताळेबंद यांचा अभ्यास किती महत्वपूर्ण आहे हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून उपस्थित विध्यार्थ्यांना सांगितले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. योगिता पाटील, प्रा. ज्योती जाखेटे, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. विनोद महाजन व आदी प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यानी विशेष सहकार्य केले.


 

Tags: #raysoni biznis manegment #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महिलेचा विनयभंग ; भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

समांतर विद्युत वितरण परवान्याबाबत महावितरण समर्थपणे बाजू मांडेल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

समांतर विद्युत वितरण परवान्याबाबत महावितरण समर्थपणे बाजू मांडेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon