• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

‘माझे जळगाव, स्वच्छ जळगाव’चा नारा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी शहरात चैतन्यमय वातावरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘माझे जळगाव, स्वच्छ जळगाव’चा नारा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी शहरात चैतन्यमय वातावरण

महापालिका शाळांच्या वतीने स्थापना दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅली

जळगाव (प्रतिनिधी):-जळगाव शहर महानगरपालिकेच्या २३ व्या  स्थापना दिनानिमित्त शिक्षण विभागाच्या वतीने शहरात मंगळवारी भव्य विद्यार्थी रॅलीचे आयोजन करण्यात आले. महापौर दीपमाला काळे यांच्या ‘माझे जळगाव, स्वच्छ जळगाव’ या संकल्पनेवर आधारित या रॅलीद्वारे शहरवासीयांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. बळीराम पेठ परिसरातून काढण्यात आलेल्या या रॅलीत रामभाऊ चौबे हायस्कूल, रामभाऊ चौबे कन्या माध्यमिक विद्यालय, महापालिका शाळा क्रमांक १० (उर्दू) आणि शाळा क्रमांक १७ या शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

“स्वच्छता पाळा, रोगराई टाळा” अशा घोषणा देत आणि हातात प्रबोधनपर फलक घेऊन विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.रॅलीदरम्यान महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधून कचरा नेहमी कचरापेटीतच टाकण्याचे आवाहन केले. विशेषतः बळीराम पेठेतील भाजी विक्रेत्यांना आपला व्यवसाय आटोपल्यानंतर सर्व कचरा तातडीने साफ करून कचराकुंडीत टाकण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहराच्या सौंदर्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पिंक कॉर्नर व सॅनिटरी वेंडिंग मशीनचे लोकार्पण
रॅलीचा समारोप झाल्यानंतर दोन्ही चौबे शाळांच्या परिसरात विद्यार्थिनींसाठी ‘पिंक कॉर्नर’ उभारण्यात आला असून, तिथे सॅनिटरी वेंडिंग मशीनचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सेवानिवृत्त होत असलेल्या शिक्षिका प्रतिभा देशमुख यांचा महापौरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याप्रसंगी महापौर दीपमाला काळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, माजी महापौर व शिवसेनेचे गटनेते विष्णू भंगाळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला व बालकल्याण समिती सदस्य डॉ. अमृता सोनवणे, विद्या सोनवणे, नगरसेविका मंगलाताई चौधरी, नगरसेवक अनिल अडकमोल, प्रशासन अधिकारी खलील शेख, महिला व बालकल्याण अधीक्षक महेंद्र पाटील, चौबे हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर पाटील, रामभाऊ चौबे कन्या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र राजपूत, उर्दू शाळा क्र. १० चे मुख्याध्यापक शेख नईमुद्दीन, शाळा क्र. १७ चे मुख्याध्यापक सचिन बोरसे मंचावर उपस्थित होते.

यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे म्हणाले की, शाळांमध्ये विवेकी पिढी घडवण्यासाठी शिक्षक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. महापालिका शाळांच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. तर महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आनंद वाटला असे सांगितले.

सामाजिक संस्थांच्या मदतीने शाळांचा कायापालट करण्याचा आमचा मानस आहे. जळगाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करा. उच्च दर्जाचे शिक्षण महापालिकेच्या शाळेमध्ये मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Tags: #jalgaon manpa news
Previous Post

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

Next Post

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक
1xbet russia

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक

March 25, 2026
तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक
जैन कंपनी

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

March 25, 2026
‘माझे जळगाव, स्वच्छ जळगाव’चा नारा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी शहरात चैतन्यमय वातावरण
1xbet russia

‘माझे जळगाव, स्वच्छ जळगाव’चा नारा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी शहरात चैतन्यमय वातावरण

March 25, 2026
२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई
1xbet russia

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक

March 25, 2026
तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

March 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!