डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) :- डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागातर्फे क्रॅक द क्वीजमध्ये टीम रेटीक्युलीन विजेती ठरली.
या स्पर्धेचे उद्घाटन वैद्यकीय महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. अर्विकर सर, अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके सर,विभाग प्रमुख डॉ. धनंजय बोरोले सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. पास टीम, पर्ल्स प्रशियन टीम , रेटीक्युलीन टीम, काँगो रेड टीम, फौचेट्स टीम या पाच टीमने सहभाग घेतला.एकूण सहा राउंडमध्ये ही स्पर्धा झाली. एका संघा मध्ये तीन विद्यार्थ्यांचा सहभाग होता. रेटीक्युलीन संघाने प्रथम क्रमांक पटकावला या संघामध्ये सुमेध तामगिरे, श्रीकृष्ण इंगळे, ओमकार शेलार यांचा समावेश होता. द्वितीय विजेते फौचेट्स तर तृतीय पास टीम विजेते ठरले.अतिशय उत्कंठावर्धक आणि चुरशीची ही क्विझ ठरली. डॉ. राशी अग्रवाल आणि डॉ. श्रुती बियाणी यांनी सुत्रसंचालन तसेच आभार मानले. परिक्षक म्हणून डॉ. धनंजय बोरोले,डॉ. रेशमा वानखेडे, डॉ. प्रिती बेदमुथा यांनी काम पाहीले. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ. झशांक जोशी, डॉ. अंकिता, डॉ.प्रियांका येणकुरे , डॉ. प्रणिता जायभाये, डॉ. प्रज्ञा मंडलापुरे डॉ. श्रद्धा उबाळे, डॉ. मंजिरी गेडाम यांनी तर गुणलेखन डॉ. प्रज्वल मंत्री,डॉ. सायली घाडगे यांनी केले.