विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुंची चौकशी करण्याची राष्ट्रवादीची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) – येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये व्यवस्थापनाचे वाद सुरु असताना देखील एका गटाच्या मागणीनुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे प्र-कुलगुरू यांनी सहाय्यक प्राध्यापकाला सहयोगी प्राध्यापक म्हणून पदोन्नती देण्यासाठी समिती नेमली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर सचिव ऍड. कुणाल पवार यांनी, प्र-कुलगुरू यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कुणाल पवार यांनी पुढे म्हटले आहे कि, सहाय्यक प्राध्यापकातुन सहयोगी प्राध्यापक या पदावर पदोन्नतीकरिता युजीसी व महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष सदर संस्थेचे अध्यक्ष किवा संस्थेने नाम निर्देशीत केलेले संस्थेचे पदाधिकारी असतात. परंतु जजिमविप्र संस्थेच्या महाविद्यालयात आज दि. १ ऑक्टोबर २० रोजी झालेल्या निवड समितीत महाविद्यालयात एकापेक्षा अधिक जणांचे व्यवस्थापनाचे वाद सुरु असताना विद्यापीठाच्या प्र- कुलगुरूंनी एका गटाने केलेल्या मागणी नुसार निवड समिती दिली. हा इतर गटांवर अन्याय असून सदरची बाब न्याय प्रविष्ठ असताना देखील विद्यापिठाने निवड समिती देणे हे कसे काय घडून आले ?
या वरून असे दिसुन येते की, प्रकुलगुरू हे कोणाच्या तरी दबावाखाली किंवा एखाद्या आमिषापोटी काम करत आहेत. एका तालुक्यात वेगळा न्याय दिला जातो तिथ कमिटी दिली जात नाही फक्त जळगाव मधील एका संस्थेला का हे सर्व दिल जाते ? स्वतः कुलगुरू साहेब निर्णय देताना वेगळा देतात, जो सन 2017 मधे दिला आहे आणि आता काय एवढा मोठा फरक झाला की प्र-कुलगुरू हे कुलगुरूंचा आदेश न जुमानता काम करत आहे ? म्हणून आम्ही सदर बाबींचा निषेध करतो, असेही अँड कुणाल पवार (जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महानगर सचीव) व भुषण भदाने (जळगाव जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस) यांनी सांगितले आहे.