सर्वाधिक रावेरमध्ये २१% तर सर्वात कमी पाचोऱ्यात ९%
जळगांव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात १५.६२% मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये मतदारांचा प्रतिसाद मिसळलेला दिसून आला असून, काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात मतदान झाले, तर काही ठिकाणी मतदार कमी प्रमाणात मतदान करताना दिसले.
मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारीः
* रावेर: २०.५०% – सर्वाधिक मतदान
* चाळीसगावः १७.९०%
* जळगाव ग्रामीणः १७.८३%
* भुसावळः १६.४२%
* मुक्ताईनगरः १६.१७%
* जळगाव शहर : १५.८८%
* जामनेर : १५.१३%
* चोपडा :१४.९०%
* एरंडोल : १४.३९%
* अमळनेरः १४%
* पाचोराः ८.५३% सर्वात कमी मतदान