अमळनेर तालुक्यातील जानवे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील जानवे येथील शिवारातील ठिबक साहित्य बनवण्याच्या कंपनीतून ५३ हजार ५०० रुपयांची मशिनरी चोरट्याने चोरून नेल्याची घटना ११ रोजी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जानवे येथील कृष्णा साहेबराव पाटील यांचे गट नंबर ७२/२ ब मधील शेतात ठिबक साहित्य बनवण्याची कंपनी आहे. तेथे पत्र्याचे शेड उभारले आहे. दिनांक ११ रोजी रात्री ते पत्र्याचे शेडमध्ये लाईट सुरू करून बाजूला असलेल्या पोल्ट्री शेडमध्ये जाऊन झोपले. दिनांक १२ रोजी सकाळी त्यांनी शेड पाहिले असता अज्ञात चोरट्याने दरवाजाचे स्क्रू उघडून गोडाऊनचा पत्रा उचकाऊन सुमारे ५३ हजार रुपयांचे साहित्य चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीस आले. कृष्णा पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.