भडगाव शहरात बाळद रस्त्यावर घडली घटना
भडगाव (प्रतिनिधी) :- शहरातील बाळद रस्त्यावर गॅरेज दुकान उघडत असताना एक तरुण तिथे आला व त्या गॅरेज मालकाच्या मोबाईलवर आलेल्या इंस्टाग्राम वर मेसेज बाबत राग अनावर झाल्याने थेट त्याच्या डोक्यावर व मांडीवर चाकू हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश विश्वनाथ पाटील (वय-२७ रा. बाळद बु. ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बाळद खु. येथील प्रविण शंकर कोळी हा माझा मित्र असुन त्याचा लहान भाउ विवेक शंकर कोळी यास मी ओळखतो. प्रविण शंकर कोळी व त्याची पत्नी योगिता कोळी यांचेत घरगुती कारणावरुन सुमारे १५ दिवसापूर्वी वाद झाले होते. या कारणावरुन योगिता कोळी हि तिच्या दोन्ही मुलींना घेवुन तिच्या आई वडीलांकडे निघुन गेली होती. त्यानंतर प्रविण शंकर कोळी हा योगिता कोळी हिचे आई वडिलांकडे जावुन त्याच्या दोन्ही मुली घरी बाळद खु.येथे घेउन आला होता. म्हणून योगिता कोळी हिने मला माझ्या मोबाईल वर फोन करुन विचारले होते की,माझ्या मुली घरी आल्या आहेत काय व व्यवस्थित आहे काय तसेच योगिता कोळी हिने मला सदर मुली बाबत इंस्टाग्राम वर मेसेज केलेला होता.
सदर इंस्टाग्राम वरील मॅसेज बाबत प्रविण कोळी याचा लहान भाऊ विवेक कोळी यास माहित झाल्याने त्यास त्याचा राग आला होता. त्याबाबत त्याने गावातील मुलांना सांगितलें की महेश पाटील यास सोडणार नाही असे सांगत आज सकाळी १० वा. चे सुमारास भडगाव बाळद रोड वरील माझ्या गैरेज वर आलो. गॅरेज उघडुन टु व्हीलर गाडीचे काम करीत होतो त्यानंतर सुमारे अर्धा तासाने १०.१५ वा. चे सुमारास विवेक शंकर कोळी हा माझा जवळ आला त्याने त्याचे हातातील धारदार चाकुने माझ्या पाठीवर, मांडीवर, डोक्यावर मारून दुखापत केली असुन मला शिवीगाळ करुन आज तुला जिवंत सोडनार नाही, तुला मारुन टाकेन अशी धमकी दिली. म्हणुन विवेक शंकर कोळी याचेविरुध्द भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ.प्रदीप चौधरी हे करीत आहे.