जळगाव ( प्रतिनिधी ) – वाल्मिक नगरातील कोळी पेठ येथे शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यावरून दोन गटात हाणामारी व तरूणावर तलवार हल्ला केल्याचा प्रकार शनिवारी घडला परस्परविरोधातील तक्रारींवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
रवि बाविस्कर (वय-३४ , रा. वाल्मिक नगर, कोळी पेठ ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते शनिवारी दुपारी वाल्मिक नगरातून जात असतांना सुरेश ठाकरे याने थांबवून शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. सुरेश ठाकरे, शंकर ठाकरे, गणेश ठाकरे ( रा. वाल्मिक नगर ) आणि हर्षल सोनवणे ( रा. मेस्कोमाता नगर ) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. सुरेश ठाकरे आणि शंकर ठाकरे यांनी तलवारी रवि बाविस्कर याच्या डोक्यावर आणि हातावर वार करून जखमी केले. रवि बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित सुरेश ठाकरे, शंकर ठाकरे, गणेश ठाकरे आणि हर्षल सोनवणे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि यशोदा कणसे करीत आहेत .
दुसऱ्या फिर्यादीत शंकर ठाकरे यांनी म्हटले आहे की, रवि बाविस्कर याला वाल्मिक नगरात २७ नोव्हेंबररोजी दुपारी शिविगाळ केल्याचा जाब विचारला. याचा राग आल्याने रवि बाविस्कर याने शंकर ठाकरे याला शिवीगाळ करून लोखंडी पाईपने मारहाण करून डोक्याला गंभीर दुखापत केली चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. शनीपेठ पोलीसात त्यांच्या तक्रारीवरून संशयित रवि बाविस्कर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना किरण वानखेडे करीत आहेत .