जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील ईदगाह मैदानावर सोबत उभे असलेल्या दोन भावांना टॉमीने मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली. ही घटना शनिवारी दि. १४ सप्टेंबर रोजी अजिंठा चौफुलीजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जुनेद खान युनूस खान (वय २७, रा.मास्टर कॉलनी) व त्यांचे चुलत भाऊ राहिल खान हे इदगाह मैदानासमोर उभे होते. त्यावेळी एकाने मागून येऊन दोघांना लोखंडी टॉमीने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी जुनेद खान यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि राजेंद्र उगले करीत आहेत.