पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा गावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा गावातील एका तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. यानंतर पोलिस पाटलांना सायंकाळच्यावेळेत मारहाण झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ पाचोरा येथे हलवण्यात आले. मात्र या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला रविवारी संध्याकाळपर्यंत कुठलीही नोंद नव्हती.
खडकदेवळा गावातील एका ३० वर्षीय वयाच्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यानंतर गावातील पोलिस पाटील यांना दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान जबर मारहाण करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत पाचोरा येथे संबंधित पोलिस पाटलांना पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत. मात्र या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला रविवारी संध्याकाळपर्यंत कुठलीही नोंद नव्हती.