भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : बिल्डींग बांधकामाच्या वादातून एकास मारहाण करण्यात आल्याचे घटना शनिवार दि. १५ जून रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जावेद शहा रज्जाक शहा (वय ४८ ग्रीन पार्क, खडका रोड, भुसावळ) हे बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी बांधलेल्या बिल्डींग बांधकामाच्या वादातून संशयीत रहिम शाह हुसेन शाह, मौसीन शाह उर्फ बाबू, वहिद शाह, अयूब शाह (ग्रीन पार्क, खडका रोड, भुसावळ) यांनी शिविगाळ करीत मारहाण केली. ही घटना फिर्यादीच्या घरासमोर घडली. तपास नाईक शशिकांत तायडे करीत आहेत.