जळगाव ( प्रतिनिधी ) – आधीच्या वादाचा गुन्हा नोंदविण्यात बिट हवालदार श्याम पाटीलसह पोलिसांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करीत आज म्हसावद जवळ रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केलेल्या सागर खडसे याचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला.

पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथे दोघांना दारू पिण्यामुळे हटकल्याचा राग आल्याने नऊ ते दहा जणांच्या जमावाने सागर गणेश खडसे (वय-२२ , रा. दहीगाव संत ता. पाचोरा ) याच्या परिवाराला बेदम मारहाण केल्याची घटना १३ सप्टेंबररेाजी दुपारी घडली होती. ही मारहाण होत असताना दहिगाव संत गावातील एकही व्यक्ती भांडण सोडवायला आणि मध्यस्थीसाठी मध्ये पडला नव्हता त्यानंतर मारहाण करणारांच्या विरोधात सागरच्या कुटुंबीयांनी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता मात्र हा गुन्हा नोंदवताना पोलिसांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप सागरच्या आई कल्पनाबाई खडसे यांनी आज केला कल्पनाबाई यांच्या म्हणण्यानुसार मारहाण करणारे जवळपास दहा लोक असता पोलिसांनी फक्त ४ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असताना पोलिसांची भूमिका चुकीची होती म्हणून या कुटुंबाने डीवायएसपीचीही भेट घेऊन पोलिसांनी न्यायाची भूमिका घ्यावी अशी मागणी केली होती मात्र पोलिस हवालदार श्याम पाटीलने आपल्यालाच धक्काबुक्की केल्याच्या धक्क्याने सागर खडसेची मानसिक स्थिती खचली होती . आपल्याला पोलीस न्याय देणार नाहीत आणि भांडण करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक सुखाने राहू देणार नाहीत अशा विचारांनी सागर खचून गेला होता या खचलेल्या मनस्थितीमुळेच सागरने आज आत्महत्या केल्याचा आरोप सागरच्या आई , बहीण आणि भावाने केला आहे
सागराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा हवालदार श्याम पाटील आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर दाखल करावा अशी मागणी कल्पनाबाई यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना केली सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पोलिसांनी आणलेला होता आपल्या या मागणीसाठी त्यांनी सागरचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता
म्हसावदजवळ आज सकाळी रेल्वेमार्गावरील पोल नं ३९४\११/१२ अपलाईन जवळ दहिगाव सतं (ता पाचोरा ) येथील रहिवासी सागर गणेश खडसे (वय २२ वर्षे ) याने स्वत धावत्या रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या केली
सागरचे वडील वडिल.गणेश महादेव खडसे रिक्षा चालक आहेत आणि आई.कल्पनाबाई गणेश खडसे गृहिणी आहेत गावातील काही लोकांशी या कुटुंबाचा वाद झाला होता त्यावेळी काही लोकांनी लोहारा व कळमसरातील नातेवाईकांना बोलाऊन सागरला मारहान केल्याने पाचोरा पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता रेल्वे आरपीएफ पोलिस प्रमोद सांगळे.(म्हसावद) , पो.ना. स्वप्नील पाटील , पो काॅ हेमंत पाटील हे पुढील तपास करीत आहे.
कल्पना खडसे यांचे आरोप गैरसमजुतीतून – पो नि नजन पाटील
सागर खडसेच्या आई कल्पनाबाई खडसे यांनी पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल पाचोऱ्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी सांगितले की , या आरोपांमागे काही चिथावणीची शंका वाटते कल्पनाबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून ज्या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या आरोपी गटाच्या तक्रारीवरून खडसे यांचं गटाच्या विरोधातसुद्धा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. खडसे यांच्या फिर्यादीत ५ आरोपी आणि त्यांच्या लोहारा व कळमसरा येथील अन्य नातेवाइकांचीही नावे आहेत. या नातेवाईकांची नावे निष्पन्न केली जातील बिट अमलदाराकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासासाठी सोपवला जातो. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेत बिट अंमलदार श्याम पाटील यांची काही भूमिका असण्याचा प्रश्नच येत नाही. या दोन्ही तक्रारी सहाय्यक फौजदार रामदास चौधरी यांनी दाखल करून घेतल्या आहेत. खडसे यांना आम्ही वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले तेंव्हा तेच त्यांच्या मनाने डीवायएसपी यांच्याकडे गेले होते. त्यांना तसे जाण्याची गरज नव्हती असे आम्ही डीवायएसपी साहेबांनाही सांगितले होते.







