पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील तामसवाडी येथे मटनच्या दुकानातील रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून चाकूचा धाक दाखवून मारहाण के ली. याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आडगाव येथील विकास हरदास राठोड हे तामसवाडी येथे दि. ४ रोजी मटन घेण्यासाठी गेले. या ठिकाणी हेमंत उर्फ नाट्य मच्छिद्र पवार (वय २२, रा. तामसवाडी, ता. पारोळा) याने राठोड यास मटन दुकानात असलेल्या रांगेतील नंबरच्या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच त्याच्या हातातील चाकू काढत राठोड यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यामध्ये राठोड यांच्या डाव्या खांद्याला दुखापत केली झाली.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित हेमंत उर्फ नाट्या पवार या तडीपार असलेल्या संशयिताला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरदीप वसावे करीत आहेत.