जळगाव शहरातील गोपाळपूरा भागातील घटना
जळगाव : कौटुंबिक वादातून महिलेला तिच्या पतीने विळ्याच्या मागच्या बाजूने डोक्यावर, हातावर व पायावर मारून दुखापत केली. ही घटना दि. २८ जुलै रोजी घडली. या प्रकरणी महिलेने शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार कार्यवाही सुरु आहे.
अनिता राजेश पवार (३६, रा. गोपालपुरा) असे जखमी महिलेचे नाव आहे. रविवारी दि. २८ जुलै रोजी घरी पती-पत्नीमध्ये वाद झाले. यात पतीने विळ्याच्या मागच्या बाजूने डोक्यावर, हातावर व पायावर मारून दुखापत केली. या प्रकरणी महिलेने शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पती राजेश पवारविरुद्ध बीएनएस कलम ११८(१), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक उमेश ठाकूर करीत आहेत.