जळगाव ( प्रतिनिधी ) – संभाजी नगरातील त्र्यंबक नगरात प्लॉटचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन पती – पत्नीसह शालकाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळईने बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून , शहरातील संभाजी नगरातील त्र्यंबक नगरात मंगेश सुभाष रंधे (वय-३५) हा तरुण वास्तव्यास आहे. प्लॉटचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन रविवारी ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आदित्य अहिरे, नेहा अहिरे व त्यांच्योबत असलेल्या दोन अज्ञात व्यक्ती सर्व रा. शिवाजी नगर, जळगाव यांनी मंगेश रंधे यांच्या डोक्यात लोखंडी सळई टाकून बेदम मारहाण केली. तसेच त्यांना तु जर माझ्या परत रस्त्यात आला तर तुला सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. मंगेश रंधे याने सोमवारी १० ऑक्टोबर रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आदित्य सुरेश अहिरे, नेहा आदित्य अहिरे व इतर दोन अज्ञात इसम सर्व रा. शिवाजी नगर यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.