मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) – तालुक्यातील माळेगाव शिवारात रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या दांपत्याला सात ते आठ जणांच्या टोळक्याने रोकडसह दागिने लुटून नेल्याची घटना बुधवारी उघडकीस आली असून या दांपत्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडून ३७ हजारांचा मुद्देमाल लुटून नेला.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , पंकज रामसिंग राठोड (वय-२१) रा. जोंधनखेडा ता. मुक्ताईनगर हा पत्नी सपना राठोड यांच्यासोबत मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव शिवारातील कालिंका माता मंदीराच्या पुढे १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असतांना त्यावेळी पती-पत्नी हे लघुशंकेसाठी थांबले. त्याचवेळी बहादू, तोरे, आणि प्रताप याच्यासह इतर ७ अनोळखी जाण येवून दोघा नवरा बायकोला जंगलात नेवून बेदम मारहाण केली. तर पत्नी सपनाच्या अंगावरील दागिने व १२०० रूपयांची रोकड असा एकुण ३७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाला जबरी चोरून नेला आहे. याप्रकरणी दाम्पत्याने मुक्ताईनगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली . त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सात संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.