जळगावात त्रिवेणी समूहाच्या वतीने आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात रोटरी सभागृहात त्रिवेणी समूहाच्या वतीने “श्रावण सरी २०२४” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात महिलांनी मराठमोळी वेशभूषा करून मराठी गीतांवर आधारित नृत्य, गाणी सादर केली. महिलांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. यापूर्वीही मागील वर्षी श्रावण सरी आणि हळदी कुंकू या उपक्रमाला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांत ३०० महिलांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात महिलांना आरोग्यविषयक माहिती देताना डॉ. अतुल भारंबे यांनी यांनी कॅन्सर विषयी महिलांना जागृत केले. तसेच हर्षाली चौधरी, प्रभावती पाटील, मनीषा पाटील, विद्या बेंडाळे या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांना मोठ्या प्रमाणात लकी ड्रॉ देण्यात आले. त्यात सारिका पैठणी कडून पाच पैठणी साड्या, रंगधारा होम कलर अँड डेकोर कडून १० आर्टिफिशियल प्लांट, सुनंदा इमिटेशन ज्वेलरीकडून ३ मोतीहार सेट, येवले नॅचरल्सकडून ९० धूप पॅकेट तसेच हॉटेल सायली ग्रीन ,डी एमकेव्हीए मल्टीसोल्युशन, नमस्कार प्लाय, ग्लोबल कॅन्सर हॉस्पिटल यांनी सहकार्य केले.
आयोजक सुरेखा राहुल पवार, वैशाली जितेंद्र बोंडे, शुभांगी पराग पाटील यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमांत मीनाक्षी सपकाळे, भारती सोनवणे, पराग पाटील, भाग्यश्री शर्मा, डॉ. अतुल भारंबे, रुपाली येवले, सारिका दानेज, सुनंदा पाटील, मुकेश घुगे, गोरख बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.