जळगाव ( प्रतिनिधी ) – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाद्वारे ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात होणार आहे.
या संमेलनासाठी खान्देशातील चित्रकारांनी बोधचिन्ह पाठवावे, असे आवाहन मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरच्या वतीने करण्यात आले आहे. खान्देशी संस्कृती या संकल्पनेवर (थीम) आधारित अर्थात खान्देशची कला, साहित्य, संस्कृती, सामाजिकता इत्यादी वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब उमटणारे बोधचिन्ह खान्देशातील कलावंतांनी पाठवावे. इच्छुक चित्रकारांनी ए फोर साईजमध्ये बोधचिन्ह २० जुलै २०२३ पर्यंत अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ, रावसाहेब नांदेडकर सभागृह, न्यू प्लॉट, अमळनेर, जि. जळगाव येथे पाठवावे. निवडलेल्या बोधचिन्हाच्या चित्रकाराचा साहित्य संमेलनात सन्मान केला जाणार आहे. प्लास्टिक कव्हरमध्ये लोगो पाठवावा. अधिक माहितीसाठी शरद सोनवणे (९४२०१०८३०५), नरेंद्र निकुंभ (९१२१६३९०७८), सोमनाथ ब्रह्मे (९७३०६७७२३९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.