मराठा समाजावर लाठीचार्ज ; गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा
जळगावात बीआरएस पक्षाकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण संदर्भात उपोषण सुरू होते. यावेळी प्रशासनच्या माध्यमातून उपोषण सोडण्याचा प्रयत्न केला . पण यावेळी आंदोलन करते यांनी उपोषण सोडण्यास नकार दिल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी २ सप्टेंबर रोजी भारत राष्ट्रीय समितीतर्फे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, समाजाच्या बांधवांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे. या घटनेची जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अन्यथा भारत राष्ट्र समितीतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशाराही दिला आहे.
यावेळी बीआरएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील, प्रमोद झवर, भिकण सोनवणे, भगवान सोनार, नितीन तायडे, भगवान धनगर, भरत पाटील, कामीन खान, सय्यद इरफान, प्रा.दिपक आरडेसर,प्रा.सुरेश अत्तरदे,कुणाल बारी,सागर पाटील, यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.