राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्ताने आयोजन
चाळीसगाव (प्रतिनिधी) : राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेनेच्या जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्ष अनिता शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राहुल धर्मा जाधव उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा मथुराई माध्यमिक विद्यालय, खडकी येथे संपन्न झाला. विद्यालयातील २४ विद्यार्थिनींना सन्मान चिन्ह देण्यात आले. निबंध स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या १२७ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रथम प्रणाली अविनाश कुमावत, द्वितीय शितल सिताराम यादव, तृतीय सिद्धी अभिमन गांगुर्डे, इयत्ता सहावीच्या वर्गात वैष्णवी राजेंद्र कुमार प्रथम, नेहा सिताराम यादव द्वितीय, मानसी योगेश पाचोरे तृतीय, इयत्ता सातवीच्या वर्गात सरिता शरद पवार प्रथम, द्वितीय चेतना संदीप जाने, नेहा प्रकाश पवार तृतीय, इयत्ता आठवीच्या वर्गात हर्षदा संदीप सोनवणे प्रथम, दुर्वा गणेश मस्के द्वितीय, मोनाली प्रवीण डोखे तृतीय, इयत्ता नववीच्या वर्गात जयश्री गणेश मस्के प्रथम, समीक्षा संदीप सोनवणे द्वितीय, योगिता प्रवीण डोखे तृतीय आल्यात.
इयत्ता दहावीच्या वर्गात दीक्षित गंभीर वायकर प्रथम, द्वितीय डिंपल पंडित कोल्हे , निशा योगेश ठाकरे तृतीय, इयत्ता अकरावीच्या वर्गात प्रथम ऋतुजा अशोक तांबे, निकिता भीमराव मांडोळे द्वितीय, वैष्णवी रंगराव मंडोळे तृतीय, इयत्ता बारावीच्या वर्गात वैष्णवी अण्णा साळुंखे प्रथम, भाग्यश्री ज्ञानेश्वर मराठे द्वितीय, गौरी धनराज जगताप तृतीय या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल भिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, चाळीसगाव शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, शहर उपाध्यक्ष कैलास पाटील, तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुका संघटक शेखर पाटील, नवले, अशोक राठोड, उमेश पाटील तसेच विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.