पारोळा ( प्रतिनिधी ) – शेतातील रस्त्याच्या वादातून मुलासह वडीलांना बेदम मारहाण केल्याची घटना तामसवाडी येथे घडली. सात जणांविरोधात पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील नवल माणिक पाटील (वय-२८) १ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी तामसवाडी शिवारातील त्याच्या शेतात जात असतांना त्यांच्या शेताच्या शेजारी राहणारे प्रविण बापू पाटील यांनी शेतातील वाहिवाट रस्त्याच्या कारणावरून नवल पाटील याला मारहाण केली. यावेळी प्रविण पाटील याच्यासह खंडू पाटील, पांडूरंग पाटील, अनिल पाटील, वसंत पाटील, उषाबाई पाटील ( रा. तामसवाडी ) आणि रविंद्र पाटील ( रा. शेरूळ ता. मालेगाव जि. नाशिक ) यांनी मिळून शेतात नवल पाटील आणि त्यांचे वडील माणिक पाटील यांनी शिवीगाळ करून लाठ्या काठ्या आणि लोखंडी सळईने बेदम मारहाण करून जखमी केले होते. नवल पाटील यांनी पारोळा न्यायालयात तक्रार दिली होती.न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित आरोपींविरोधात पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय भोई करीत आहेत .








