एरंडोल ( प्रतिनिधी )-– तालुक्यातील टोळी येथे लसीकरणाच्या ठिकाणी वशिलेबाजी चालणार नाही, जे असतील त्यांनी रांगेत उभे रहा असे बोलण्याचा राग आला म्हणून दोन गटात मारामारी झाली त्यानंतर एका गटातील आठ लोकांवर तर दुसऱ्या गटातील नऊ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या शाळेत कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी गावातील नागरिक हे रांगेत उभे होते. त्याठिकाणी शरद मराठे हे लस चा दुसरा डोस घेण्यासाठी आले होते.बाळू मराठे हे शरद मराठे यांना पाहून बोलले की याठिकाणी वशिलेबाजी चालणार नाही जे असतील त्यांनी रांगेत उभे रहा शरद मराठे यांनी सांगितले की मी रांगेतच उभा आहे त्यानंतर शिवीगाळ करून पायातील बूट काढून मारू लागले ते पाहून भुरा मराठे, आबा मराठे, अमोल मराठे, शरद मराठे, पांडुरंग मराठे , दादू मराठे, यशवंत मोरे, प्रल्हाद मराठे, अमोल मराठे यांनी लाठ्याकाठ्यांनी शरद मराठे , कोमल मराठे , भूषण मराठे, ज्ञानेश्वर पाटील, गजानन पाटील, गोपाल पाटील, मकड्या पाटील या दोन्ही गटातील 17 जणांनी आपसात हाणामारी केली
शरद मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांच्या विरोधात तर बाळू मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांच्या विरोधात असे दोन्ही गटाने एकमेकांच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर एरंडोल पोलीस स्थानकात भादवि कलम 141,143,147,149,324,323,504,506,34 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो नि ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली राजू पाटील, विकास देशमुख हे पुढील तपास करीत आहे.
लसीकरणाच्या ठिकाणी झालेल्या हाणामारीमुळे आमदार चिमणराव पाटील यांनी दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले. सध्या तालुक्यात जास्तीत जास्त व लवकर लस उपलब्ध आपण करून देत आहोत त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे आजच्या या घटनेमुळे आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे. यापुढे अशी घटना लसीकरणाच्या ठिकाणी होऊ नये यांची काळजी नागरिकांनी घ्यावी तालुक्यासाठी लसीकरणाच्या जास्तीत जास्त साठा यापुढेही उपलब्ध करून देण्यात येईल असे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.