भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मानपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रेम तायडे व मिथुन बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरमध्ये असंख्य अनुयायाबरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता
बौद्ध स्तूपाच्या आकाराप्रमाणे दीक्षाभूमीला धम्मचक्र स्तूप असेही म्हटले जाते प्रत्येकवर्षी अशोक विजयादशमी हा दिवस दीक्षाभूमी येथे व सर्व महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो. मानपूर येथे नालंदा बुद्धविहारात गावातील व्यक्तींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले महिलानी तथागत भगवान गौतम बुद्धांना चिवर अर्पण करून सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहन व खीरदान करून हा कार्यक्रम साजरा केला.
यावेळी कैलास तायडे, मुकेश तायडे (पो. पा.), मिथुन बोदडे यांनी मार्गदर्शन केले, या कार्यक्रमासाठी सोनू तायडे, सौरव तायडे, अक्षय तायडे, अजय तायडे, विशाल सपकाळे, सिद्धार्थ तायडे, आकाश तायडे, ईश्वर कोचुरे, दीपक सुरवाडे, विकास सपकाळे, प्रशिक तायडे, प्रवीण तायडे, आकाश डी. तायडे. शांताराम तायडे, रोहिदास सोनवणे, रोशन तायडे, चांगो तायडे, देविदास सपकाळे, संतोष भालेराव आदींनी परिश्रम घेतले.