जळगाव (प्रतिनिधी ) महानगर पालिकेची रखडलेली कामे, रस्त्यांचे प्रश्न आणि जळगावच्या इतर विकास कामांना सरकार प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्हा दौऱ्यावर आलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आढावा बैठक घेत आहे. याबैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, आ. किशोर पाटील , आ. चिमणराव पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी ,विरोधी पक्षनेते सुनील महाजन , जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे ,आ. चंद्रकांत पाटील ,माजी आमदार चंद्रकांत सोनवणे , संपर्क प्रमुख संजय सावंत , विलास पारकर नितीन लड्डा ,यांच्यासह शिवसेना नगरसेवक ,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.