उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना निवेदन देताना सौ जुबेदा सय्यद, शबीना रिजवान ,जरीना शेख,शहेनाज बी,ताहेरा बी,परवीन बी व फारुक शेख आदि दिसत आहे.
जळगाव (प्रतिनिधी)- हाथरस उत्तर प्रदेश येथील एका दलित मुलीवर चार नराधमांनी अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला परंतु ती चौदा दिवस जिवंत राहून मरण यातना सहन करीत २९ सप्टेंबरला ती दिल्ली येथील हॉस्पिटल मध्ये मृत्युमुखी पडली.
दिल्लीहून हाथरस येथे ही डेड बॉडी आणून स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी तिचा अंतिम संस्कार त्याच्या आई-वडिलांना न विचारता प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था याचे कारण दाखवत स्वतः त्या पीडित मुलीस अग्नि दाह देऊन त्याचा अंत्यविधी केला.
त्यांच्या या संपूर्ण कृतीचा जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीच्या महिला विभागातर्फे निषेध करण्यात आला असून त्या पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या चारी नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी, हाथरस येथे डेड बॉडी ही आई-वडिलांना न देता प्रशासनाने स्वतःह तिचे अंत्यसंस्कार केले त्या स्थानिक जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना त्वरित निलंबित करण्यात यावे व त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
योगी सरकार आल्यापासून महिलांवर होत असलेले अत्याचार व त्या ठिकाणी वाढलेली गुंडगिरी बघता उत्तर प्रदेश मधील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून त्या ठिकाणी महिलांची सुरक्षा धोक्यात आहे तसेच हाथरस ,शहांजापुरा आणि गोरखपुर मध्ये घडलेल्या घटना पासून संपूर्ण उत्तर प्रदेश राज्य हादरून गेले असल्याने त्या योगी सरकारला त्वरित बरखास्त करा अशी एकमुखी मागणी मानियार बिरादरी च्या महिला विभागाच्या अध्यक्षा सौ जुबेदा सय्यद चाँद, हाजरा फारुक शेख, सायमा उमर शेख, शबीना रिझवान सै हारीश,जरीना बी शेख रउफ, शहेनाज बी यासीन ,ताहेरा बी नईम, परवीन बी. सादिक, शिफ्ता समीर, बुशरा आमिर व फारुक शेख अब्दुल्ला यांनी माननीय पंतप्रधान व राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केलेली आहे.
सदरचे निवेदन उपजिल्हाधिकारी महसूल श्री रवींद्र भारदे यांनी स्वीकारले व आपल्या भावना केंद्र शासनाला कळविण्यात येतील असे आश्वासन दिले.