नवी दिल्ली ;- सोमवारी कांगपोकपी जिल्ह्यात मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या सुरक्षा ताफ्यावर सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे .
मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमांत्री एन बिरेन सिंग यांच्या सुरक्षा ताफा आज सकाळी 10.30 च्या सुमारास इंफाळहून जिरीबाम जिल्ह्याकडे जात हाेता. राष्ट्रीय महामार्ग-37 वर ताफ्यावर सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला अहे.
जिरीबाम एकाची हत्या झाल्यानंतर संतप्त जमावाने सरकारी कार्यालयांसह सुमारे 70 घरे जाळली हाेती. यानंतर शेकडो नागरिकांनी भागातून स्थालंतर केले आहे. मागील काही दिवसांपासून हिंसाचाराग्रस्त असणार्या जिरीबामला भेट देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा आज नियाेजित दौरा होता. या दाैर्याला जाताना मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याने मणिपूरमध्ये खळबळ माजली आहे.जखमी सुरक्षा कर्मचार्याला इंफाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.