मतदारांचा विश्वास ; चाळीसगावात जुन्या मित्रांची ‘हायव्होल्टेज’ लढत !
चाळीसगाव (विशेष प्रतिनिधी ) ;- मतदारसंघात एकेकाळी चांगले मित्र असलेले आ. मंगेश चव्हाण आणि माजी खासदार उन्मेष पाटील हे अनुक्रमे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमने-सामने आले आहेत. भाजपकडून आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरुद्ध माजी खासदार उन्मेष पाटील हे मैदानात उतरले आहेत.
चाळीसगावात उन्मेष पाटील यांना आमदारकी आणि खासदारकी देऊनसुद्धा चाळीसगाव तालुक्याचा फारसा विकास झालेला दिसून येत नसल्याने चाळीसगावकरांच्या मनामनामध्ये एकच वादा ,फिरसे आमदार मंगेश दादा असेच चित्र चाळीसगाव मतदार संघात दिसून येत आहे.
चाळीसगावच्या लढतीला जिल्ह्यातील सर्वांत ‘हायव्होल्टेज’ लढत मानली जात आहे. मात्र मतदारांचा आ. मंगेश चव्हाण यांना भरघोस पाठिंबा प्रचार फेऱ्या आणि जाहीर सभांमधून दिसून येत आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा चाळीसगावात झाली . यावेळी अमित शाह यांनीही विरोधकांचा आपल्या भाषणातून चांगला समाचार घेतला होता. सर्वत्र एकच चित्र मंगेशदादा हेच खरे भूमिपुत्र अशीच चर्चा सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे.