मांगलवाडीसह परिसरातील नागरिकांच्या आ.चंद्रकांत पाटील यांनी जाणून घेतल्या समस्या
चंद्रकात कोळी
रावेर (प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील मांगलवाडी येथे ग्रा.पं.कार्यालयाजवळ दि.१५ रोजी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची कोळी समाजाच्या विविध प्रश्नांनसंदर्भात सभा आयोजित करण्यात आली होती.सभेचे अध्यक्षस्थानी आ.चंद्रकांत पाटील होते.त्यांच्या हस्ते महर्षि वाल्मिक यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी कोळी समाजाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सपकाळे यांनी केले.
आ.चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वप्रथम मांगलवाडी गावाचा पुनर्वसन संदर्भातील प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.तसेच कोळी समाज बांधवांना एसटी जातीच्या दाखल्यासंदर्भात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याबाबत आश्वासन दिले. शबरी घरकुल, मुलांना शिष्यवृत्ती विषयक प्रश्न मार्गी लावण्याकरीता प्रयत्नशील असल्याचेही सांगितले.तसेच मुक्ताईनगर येथील आ.चंद्रकांत पाटील यांनी आमदार निधीतून मंजूर केलेले महर्षि वाल्मिकी सभागृह अंतिम टप्प्यात असून पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले.रावेर तालुक्यातील ऐनपुर, निंबोल या गावात प्रत्येकी,२५ लाखांचे सभागृह आ.चंद्रकांत पाटील यांनी मंजूर केले असल्याचे सांगितले.
या ठिकाणी उपस्थित नायब तहसिलदार संजय तायडे,विस्तार अधिकारी शिंदे साहेब, छोटू पाटील,कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष संजय कांडेलकर, चंद्रकांत कोळी, सोपानअप्पा सपकाळे,मनोहर कोळी,हरलाल कोळी, मांगलवाडी गावच्या सरपंच कमलबाई बोरसे,ग्रा.प सदस्य उमेश कोळी,पोलिस पाटील दीपक तायडे,ग्रामसेविका सरला कोळी,ग्रा. पं. कर्मचारी आदींसह परिसरातील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.