जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी ) साडी घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातून २५ ग्रॅम वजनाचे सुमारे ६० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरुन नेल्याची घटना दि. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास लाडवंजारी मंगल कार्यालयात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने त्या साडी घेण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या. थोड्यावेळानंतर शिसोदे यांना साडी मिळाल्यानंतर त्या मुलीसोबत घरी जाण्यासाठी निघाल्या. परंतु थोड्या अंतरावर आल्यानंतर छाया शिसोदा यांच्या मुलीला तिच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र दिसून आले नाही. त्यांनी मंगलकार्यालयात जावून पाहीले तरी देखील त्यांना मिळून आले नाही. त्यामुळे शिसोदे यांना मंगल कार्यालया गर्दीचा फायदा घेत कोणीतरी त्यांच्या गळ्यातून २५ ग्रॅम वजनाची ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरुन नेले. दरम्यान, छाया शिसोदे यांनी तात्काळ रामानंद नगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.