वाळूमाफियांचा हैदोस, भडगाव तालुक्यात पिंपळगाव येथील घटना
भडगाव ( प्रतिनिधी ) – गिरणा नदीपात्रातून सुरु असलेली अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी गेलेल्या प्रशासन अधिका-यावर थेट हल्ला केल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील पिंपळगाव परिसरात घडली आहे. मंडळ अधिकारी यांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश लक्ष्मणराव येंडे (वय ४०, मंडळ अधिकारी) हे दि. १० जून रोजी मध्यरात्री २.३० च्या सुमारास रात्रगस्तीसाठी गेले होते. पिंपळगाव ते भडगाव रस्त्यावर, पिरबाबा दर्ग्याजवळ त्यांना अडवून, संशयित आरोपी शिवबा राजेंद्र पाटील (रा. वसंदे, ता. भडगाव) याने विनाकारण शिवीगाळ करत वाहनावर दगडफेक केली. यात वाहन (क्र. एमएच ०५ एजे ८६४६) चे पुढील काच फोडून नुकसान करण्यात आले. या हल्ल्यामुळे शासकीय कामात अडथळा निमणि झाला असून, भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस मनोहर पाटील हे करीत आहेत.