जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील ममुराबाद येथील तरुणाने राहत्या घरी कोणी नसताना छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दि. २३ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विनोद लक्ष्मण वाघ (भिल, वय २७, रा. ममुराबाद ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात आई, ३ भाऊ, १ बहीण यांच्यासह राहत होता. शेती काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)दरम्यान, बुधवारी तो सकाळी घरी एकटाच होता. तेव्हा साधारण १२ वाजेनंतर कधीतरी त्याने राहत्या घरी छताला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
कुटुंबियांना माहिती कळताच त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी विनोद वाघ याला दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून विनोद याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेची जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.