जळगाव;- जिल्ह्यात कोविड – १९ चा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत जात आहे. पुढील काही दिवसात रुग्णसंख्या आणखी वाढत जाणार असून नागरिकांना वैद्यकीय सोई सुविधा मिळण्यास खूपच दिरंगाई होत आहे
अशा बिकट परिस्थितीत शासनाने वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी आमदार निधीतून मंजूर केलेल्या १ कोटी रु. निधी अंतर्गत आपणांस हवी असलेया यंत्र सामग्री व उपचार साहित्याचे नियोजन करून त्याचा अहवाल त्वरित तयार करावा जेणेकरून सर्व सामान्य नागरिकांची उपचाराअभावी होणारी गैरसोय टाळता येईल अशे निवेदनं आज२१एप्रिल रोजी महानगर पालिका येथे आयुक्त श्री. कुलकर्णी यांना आ. सुरेश भोळे (राजु मामा) यांनी दिले. या प्रसंगी जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी , स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत बालाणी जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, महेश जोशीं आदी उपस्थित होते.








