चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगावाहून भडगावकडे जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ओझर ते पातोंडा रस्त्यावर घडली आहे. पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
चाळीसगावाहून भडगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या छोटा हत्ती या मालवाहू गाडीच्या (क्र. एम.एच.१९ सीवाय ५८२५) धडकेत दुचाकीस्वार (क्र.एम.एच.१९ सीएस ४३५६ ) जागीच ठार झाल्याची घटना काल सायंकाळी ओझर ते पातोंडा रस्त्यावर घडली. या भिषण अपघातात पितांबर आनंदा पाटील (वय-६३ रा. बोरखेडा ता. चाळीसगाव ) याचा जागीच मृत्यू झाला. शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. छोटा हत्तीवरील अज्ञात चालक (नाव गाव माहीत नाही) पसार झाला. अनिल दयाराम पाटील ( रा. बोरखेडा ) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३०४(अ), २७९, ३३७, ४२७, १८४ व १३४(ब) प्रमाणे अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पो नि के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.