चित्रपट बघण्याचा अनुभव एका नव्या उंचीवर नेणाऱ्या सुविधासंपन्न मल्टिप्लेक्सचा उद्घाटन सोहळा जळगाव मध्ये साजरा होत आहे. स्टार सिनेमाचे उद्घाटन रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता, आ. श्री. गुलाबरावजी पाटील, पाणीपुरवठा व स्वछता मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जळगांव व आ. श्री. सुरेशजी भोळे (राजूमामा), आमदार, जळगाव यांच्या शुभहस्ते होत आहे.
यावेळी श्री. आयुषजी प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव, श्री. एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. चंद्रकांतजी सोनवणे, माजी आमदार, जळगाव, उद्योजक श्री. सुशीलजी बाफना, श्री. सिद्धार्थजी बाफना हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
३ डिसेंबर संध्याकाळपासून स्टार सिनेमा मध्ये ऍनिमल व सॅमबहादुर या चित्रपटांचा शो सुरु होतील. मूव्ही, मस्ती, मजा असा धमाल अनुभव देणाऱ्या या मल्टिप्लेक्स मध्ये सराउंड साउंड सारख्या आधुनिक सुविधांनी चित्रपट पाहण्याचा पुरेपूर आनंद प्रेक्षकांना घेता येईल. आरामात बसून चित्रपट पहायला रिक्लायनर सीट्स, लाउंजर सोफाजची सोय आहे. आणि या आनंदात भर घालायला विविध चटकदार स्नॅक्स उपलब्ध आहेतच. तेव्हा मित्रमंडळी, कुटुंबियांसह चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी स्टार सिनेमा अगदी आदर्श आहे.
राईज बेल एन्टरटेनमेन्ट एलएलपी आणि नयनतारा डेव्हलपर्स, जळगाव यांनी संयुक्तरीत्या स्टार सिनेमा या मल्टिप्लेक्सची निर्मिती केली असून, जळगावमध्ये सर्वप्रथम असा सोयीसुविधायुक्त मल्टिप्लेक्स साकारत आहे. या उद्घाटन सोहळ्याला सर्वांना सहर्ष निमंत्रण देण्यात येत आहे. स्टार सिनेमातील चित्रपटांच्या बुकिंग सुरू झाल्या असून बुक माय शो वरून त्या बुक करता येणार आहेत.