जळगाव (प्रतिनिधी) – येथील संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान व समस्त माळी समाज पंचमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू वर पालक परिचय पुस्तिकेचे विमोचन रविवारी करण्यात आले. ही पुस्तिका समाजबांधवांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
माळी समाजातील उपवर वधू-वरांसाठी दरवर्षी विवाह परिचय मेळावा आयोजित केला जातो. यंदा मात्र कोरोनामुळे मेळावा आयोजित झाला नाही. वधू-वर पालक परिचय पुस्तिका २०२२ चे प्रकाशन करण्यात आले आहे. पुस्तिकेचे विमोचन रविवारी मोजक्या समाजबांधवांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू महाराज संकुल येथे करण्यात आले
यावेळी संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे, सचिव शरद मोरे उपस्थित होते. पुस्तिकेमध्ये महाराष्ट्रातील वधू-वरांची माहिती संकलित आहे. माहिती परिपूर्ण मिळावी या दृष्टिकोनातून मांडणी करण्यात आली आहे. परिचय पुस्तिका मिळण्यासाठी शरद क्रिएशन, गोलाणी मार्केट या ठिकाणी संपर्क साधावा, अशी माहिती सचिव शरद मोरे यांनी दिली. खजिनदार विवेक महाजन, संचालक प्रकाश साबळे, गोपाळ चौधरी, सोमनाथ महाजन, डी.बी. महाजन, वामन महाजन, वसंत बिरारी, दिलीप माळी आदी उपस्थित होते.