जळगाव (प्रतिनिधी) :- येथील समस्त माळी समाजबांधवांतर्फे क्रांतीज्योती तथा विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण करून प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी उद्योजक संतोष इंगळे, ‘माळीबंधन’ चे अध्यक्ष प्रशांत महाजन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या अद्वितीय कार्याचा उल्लेख करून त्यांच्या गौरवशाली कर्तृत्वाची माहिती दिली. सावित्रीबाई फुले यांनी १९ व्या शतकात स्वतः त्रास भोगला मात्र महिला वर्गाला केवळ शिक्षितच नव्हे तर स्वावलंबी बनवून त्यांची समाजात ओळख निर्माण करून दिली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी रितेश माळी, जयंत इंगळे, कृष्णा माळी, पवन माळी, हेमंत महाजन, संदेश महाजन, हर्षल इंगळे, प्रवीण चौधरी, सुभाष महाजन, रामचंद्र माळी, सुनील चौधरी, संजय महाजन,पवन इंगळे, प्रमोद थोरात, सोनाली देऊळकर, सुनिता महाजन, वंदना इंगळे, कल्पनाताई माळी आदी उपस्थित होते.