ईव्हीएम मशीनच्या मोजणीवर घेतला संशय
जळगाव (प्रतिनिधी) :- ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा संशय व्यक्त करीत न्यायालयात विविध मुद्यांवर मांडणी करून निवडणुक रद्द करा यासाठी एरंडोल विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
औरंगाबाद हायकोर्टात ८६८/ २०२५ अन्वये याचिका दाखल झाली असून डॉ. सतिश पाटील यांच्यातर्फे व्ही. डी. साळुंखे यांनी ही याचिका दाखल
केली आहे. याचिकेत निवडणूक निर्णय अधिकारी व विजयी उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तिन बुथची मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. १७ अ फॉर्मची देखील मागणी करण्यात आली होती. नंतर व्हीव्हीपॅटच्या मतांची मागणी करण्यात आलेली आहे. करमाड खुर्द, तरवाडे व अंजनविहिरे येथील तीन बुथची मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. राज्यभरातील अनेक उमेदवारांनी याचिका दाखल केली असल्याने आज माजी मंत्री डॉ. सतिश पाटील यांनी देखील औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.