जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे कारण नसतांना महिलेला अश्लिल शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी एकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभवी केदार भट (वय ३०) रा. नशिराबाद, जळगाव या महिला आपल्या कुटुंबासह राहायला आहे. रविवारी १० मार्च रोजी रात्री ८.३० वाजता महिला ही आपल्या मुलगा स्वराज भट याच्या सोबत जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे नाटक पाहण्यासाठी आलेल्या होत्या.नाटक पाहून झाल्यानंतर रात्री ८.३० वाजता घरी जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी त्याच परिसरात भिमराव दामु अढाळके रा. खंडेराव नगर, जळगाव हा आला. त्यावेळी तो स्वराज सोबत भेटायचे असे सांगितले. त्यानंतर भेट झाल्यानंतर काहीही करण नसतांना भिमराव अढाळके यांने महिलेला अश्लील शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर महिला शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी ११ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजता संशयित आरोपी भिमराव अढाळके याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ पंकज सपकाळे हे करीत आहे.