सावदा ( प्रतिनिधी) – भाजपच्या बेटी बचाव बेटी पढाओ अभियानाच्या जिल्हा संयोजक सारीका चव्हाण यांनी आज राज्यात होणाऱ्या महिलांवरील वाढत्या अत्याचारा निषेधार्थ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.

भाजपाच्या माध्यमातून आज फैजपूर येथील प्रांतअधिकारी कैलास कडलग यांना बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. या सर्व घटनांचा निषेध करण्यात आला.
पुण्यात १४ वर्षीय मुलीवर १३ नराधमांकडून बलात्कार, यावल येथे १३ वर्षीय आदिवासी मुलीवर अत्याचार, पुण्यात चिमुकलीचे अपहरण करून बलात्कार, खेड मध्ये १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून २ महिने ६ नराधमांचा बलात्कार, साकीनाका परिसरात ३० वर्षीय महिलेवर बलात्कार व गुप्तांगात लोखंडी रॉड घुसवून हत्या. अशा घटना या पंधरा दिवसामध्ये राज्यात घडल्या पण सरकार डोळे मिटून गप्प बसले आहे, अशा नराधामांना कठोर शिक्षा देऊन महिलांना न्याय दयावा, यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. शासनाने निर्माण केलेला शक्ती कायदा कुठे आहे ? महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून पुष्कळ कालावधी उलटला तरीपण महिला आयोग अध्यक्षपद खाली का ? शासन महिला सशक्तीकरण करत आहे का. महिलांना नराधमांच्या स्वाधीन करत आहेत? असे प्रश्नसुद्धा निवेदनाद्वारे केले आहे.
या प्रसंगी बेटी बचाव बेटी पढाओच्या जिल्हा संयोजक सारीका चव्हाण, रावेर तालुका पंचायत समितीच्या योगिता वानखेडे, नगरसेविका रंजना भारंबे, डॉ प्रिया सरोदे, राजश्री चौधरी, सावदा शहर अध्यक्ष पराग पाटील, फैजपूर शहर अध्यक्ष अनंत नेहते, यावल तालुका भाजप उपाध्यक्ष नितीन नेमाडे व पदाधिकारी उपस्थित होते.







