
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शहरातील एका विवाहित महिलेचा फोटो सोशल मीडियावर एडिट करून तिची बदनामी केल्याप्रकरणी पतीविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ७ जून २०२४ ते १३ जुलै २०२६ या कालावधीत ती माहेरी राहत असताना तिच्या पतीने इन्स्टाग्रामवरील बनावट आयडीद्वारे तिचा फोटो व मोबाईल क्रमांक प्रसारित केला. तसेच फोटोवर आक्षेपार्ह मजकूर टाकून तो विविध ठिकाणी व्हायरल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याशिवाय फिर्यादीचा व तिच्या नातेवाईकांसोबतचा फोटो एडिट करून इन्स्टाग्रामवर प्रसारित करत त्यावर “Second Husband” असा मजकूर लिहून बदनामी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दीपक भगवान भालेराव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक दिलीप रोकडे करीत आहेत.










